१८ व्या आशियाई खेळांना आजपासून सुरुवात
महा एमटीबी   18-Aug-2018
 
 
 
 
 
इंडोनेशिया : १८ व्या आशियाई खेळांना आजपासून सुरुवात होणार आहे. यावर्षी इंडोनेशियामध्ये हे खेळ खेळले जाणार आहेत. यावर्षी भारताचे सगळ्यात मोठे दल इंडोनेशियाला १८ व्या आशियाई खेळासाठी पाठवण्यात आले आहे. भाला फेकमध्ये निपुण असणारे नीरज चोपडा यावर्षी भारतीय दलाचे ध्वजवाहक म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. पदकांच्या बाबतीत या खेळांमध्ये सगळ्यात पुढे नेहमीच चीन हा देश राहिला आहे. 
 
 
 
आजपासून सुरु होणाऱ्या या खेळांमध्ये भारताचे १५ पेक्षा जास्त सुवर्ण पदक आणण्याचे लक्ष्य आहे. १९५१ मध्ये नवी दिल्लीमध्ये खेळल्या गेलेल्या या खेळांमध्ये भारताने त्यावेळी १५ सुवर्ण पदक पटकावले होते. यावेळी भारत या खेळांमधील ३६ खेळांमध्ये भाग घेणार आहे. यावर्षी भारतचे खेळाडू चांगले खेळाचे प्रदर्शन करतील याची सगळ्यांना आशा आहे. 
 
 
तिरंदाजी, ऐथलेटिक्स, बैडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्सिंग, बोलिंग, ब्रिज, कैनोइ-कायक, साइक्लिंग, फेंसिंग, जिम्नैस्टिक, गोल्ड, हैंडबॉल, हॉकी, जूडो, कबड्डी, कराटे, कुराश, पेनकाक सिलात, रोलर स्पोर्ट्स, टेनिस, ताइकवांडो, सॉफ्ट टेनिस, टेबल टेनिस, वॉलिबॉल, वेटलिफ्टिंग, रेसलिंग आणि वुशू या खेळांमध्ये भारत या वर्षी भाग घेणार आहे.