केरळला केंद्राकडून ५०० कोटी रुपयांचा मदत निधी जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Aug-2018
Total Views |
 
 
 
 
तिरुवनंतपुरम : केरळ राज्यात महापुराने थैमान घातले आहे. या पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काल केरळ दौऱ्यावर गेले होते. आज झालेल्या त्यांच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी केंद्राकडून पूरग्रस्त भागांना ५०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली असून केंद्र सरकार पूरग्रस्त नागरिकांना हवी तेवढी सगळी मदत करेल असे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत दिले. 
 
 
 
 
केरळमध्ये आलेल्या या पुराने अनेक जीविन, वित्त हानी केली असल्याने एवढा मोठा निर्णय सरकारने घेतला असून यापुढे देखील जी मदत लागेल ती दिली जाईल असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. काल मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी नरेंद्र मोदी यांना पुराची संपूर्ण माहिती दिली. या पूरामध्ये मृतांचा आकडा आतापर्यंत ५० वर पोहोचला आहे. केरळ राज्यात कन्नूर, पलक्कड , इदुक्की, कोझिकोड, मल्लपुरम या ठिकाणी अतिवृष्टीमुळे धोक्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. या पावसाचा कोची विमानतळाला चांगलाच तडाखा बसला आहे. त्यामुळे कोची विमानतळ प्रवाशांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.
 
 
 
 
स्वातंत्र्योत्तर काळामध्ये केरळमध्ये पहिल्यांदाच महापूर आला आहे. राज्यात गेल्या आठवड्याभरापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात लाखो नागरिकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. तसेच ८ हजार कोटी रुपयांहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाले असून राज्यातील १० हजार किमी लांबीचे रस्ते देखील या पूरामुळे नष्ट झाले आहेत. त्यामुळे लष्कराला देखील याठिकाणी नागरिकांच्या मदतीसाठी तैनात करण्यात आले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@