केरळमधील पूरग्रस्तांना पुण्याकडून होणार पाणीपुरवठा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Aug-2018
Total Views |





पुणे : देवभूमी मानले जाणाऱ्या केरळमध्ये वरुण राजाचा कोप झालेला दिसत आहे. पूरग्रस्त केरळमध्ये मृतांचा आकडा ३२४ वर पोहोचला आहे. केरळमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. केरळमध्ये सुमारे २ लाख नागरिक बेघर झाले आहेत. अशा परिस्थितीत केरळसाठी पुण्याने मदतीचा हात पुढे केला आहे. पुण्यातून केरळला ७ लाख लीटर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. हा पाणीपुरवठा रेल्वेद्वारे केला जाणार आहे. पुण्यातील घोरपडी कोचिंग कॉम्पेल्क्स येथे केरळसाठी पाणी भरण्यात येत आहे.

 

केरळमधील अलापुझ्झा, एर्नाकुलम, पथनमतित्ता व त्रिशुर येथे भयंकर पुरस्थिती निर्माण झाली आहे. पेरियार, पंपा आणि चालाकुडी या नद्यांनी पाण्याची पातळी ओलांडली आहे. अशी माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिली. ही माहिती केरळच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दिली. गेल्या १०० वर्षांतील हा सर्वात महाभयंकर पूर असल्याचे केरळच्या मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे. आंध्र प्रदेश सरकारने केरळमधील पूरग्रस्तांना १० कोटींची मदत जाहीर केली आहे. तेलंगणा सरकारकडून केरळला २५ कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@