वरणगावात वृक्षतोड, पक्षाच्या अधिवासावरच कुर्‍हाडशेकडो पक्षांच्या पिल्लाचा मृत्यू, पक्षप्रेमींकडून संताप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Aug-2018
Total Views |
 
 
 
 
 
Turn off for: Marathi

वरणगावात वृक्षतोड, पक्षाच्या अधिवासावरच कुर्‍हाड

शेकडो पक्षांच्या पिल्लाचा मृत्यू, पक्षप्रेमींकडून संताप

भुसावळ, १८ ऑगस्ट
वरणगावात वृक्षतोडीचा कहर झाला असून पक्षी जीवन धोक्यात आले आहे. वृक्षतोडीमुळे बगळे आणि पानकावळयांच्या शेकडो पिलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याबाबत कारवाई न केल्याने पक्षीप्रेमीकडून संताप व्यक्त होत आहे.
 
वरणगावपासून हतनूर धरण जवळ असल्याने याठिकाणी जलाशयावर पक्षांच्या अनेक जाती पक्षी आढळून येतात. पक्षी संशोधनसाठी हा परिसर अत्यंत महत्वाचा मानला जातो. वरणगाव परिसरात हतनूर धरणाच्या जलशयाच्या आधाराने अनेक वृक्षांवर बगळे आणि पानकावळयांनी घरटे बनविले. नागरि वस्ती जवळील झाडांवर या पक्षांची वस्तीच निर्माण झाली. डेरेदार वृक्षांवर घरटे बांधल्याने शेकडो पिल्ले या घरट्यांमध्ये अधिवास करतात. मात्र वृक्षतोड करणार्‍यांनी कोणतीही माणूसकी न दाखता पक्षांची वस्ती असलेल्या झाडांची कत्तल केली. त्यामुळे पक्षांची घरटी नष्ट होवून शेकडो पिल्ले जमीनीवर पडून मृत झाल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.
 
 
पक्षी संशोधन आणि पक्षी संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या चातक निसर्ग संवर्धन संस्थेच्या पदाधिका-यांना आणि सदस्यांना ही बाब समजतात त्यांनी घटनास्थळ गाठून सुमारे १५० पिल्लांचा जीव वाचवला आहे. त्यांना याकामी वन विभागाच्या अधिका-यांनी सुध्दा मदत केली.अनाधिकृतपणे वृक्षतोड केल्याप्रकरणी आणि पक्षांच्या शेकडो पिल्लांचा जीव घेतला म्हणून प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची अपेक्षा नागरिकांकडून होत आहे.
 
 
यांनी वाचवला पिल्लांचा जीव
चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे लक्ष्मीकांत नेवे, अपर्णा नेवे, सत्यपालसिंग राजपूत, अतुल चौधरी, सुरेश ठाकूर, प्रशांंत पाटील तसेच वनविभागाचे पी.टी.वराडे, वनपरिक्षेत्र अधिकारी मुक्ताईनगर, वानखेडे आणि वनकर्मचारी यांनी पक्षाच्या पिलाचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न केले
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@