प्रियांका आणि तिचा बॉयफ्रेंड अडकले बंधनात
महा एमटीबी   18-Aug-2018
 
 
 
 
अमेरिका : अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकेचा प्रसिद्ध गायक निक जोनास हे दोघेही ‘लव्ह बर्ड’ बंधनात अडकले आहेत. आज प्रियांका आणि निक या दोघांनी आपल्या प्रेमाची पावती दिली असून सोशल मिडियावर या दोघांच्या एंगेजमेंटचे छायाचित्र सध्या जोरदार शेअर केले जात आहे. प्रियांका आणि निक या दोघांनी सोशल मिडियावर आपल्या एंगेजमेंटचे छायाचित्र शेअर केले आहे. 
 
 
 
 
‘माझं मन आणि आत्मा तुझाच झाला आहे….’ असं लिहित प्रियांकाने सुरेख फोटो पोस्ट केला. तर, ‘या आहेत भावी मिसेस जोनास…’, असं लिहित निकनेही तोच फोटो सोशल मिडियावर पोस्ट केला. प्रियांका आणि निक यांच्यात १० वर्षांचा फरक असला तरी देखील प्रेम हे आंधळ असत असे यांच्याकडे पाहून म्हणण्यास हरकत नाही. निक आणि प्रियांका गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत होते आणि आता अचानक लग्नबंधनात अडकणार हे प्रियांकाच्या चाहत्यांना समजताच तिच्यावर शुभेच्छा याचा वर्षाव होवू लागला आहे. 
 
 
 
 
ट्वीटरवर या दोघांचा ‘हॅशटॅग’ देखील सुरु झाला आहे. आपल्या आयुष्यातील या खास वळणावर आलेल्या प्रियांकाच्या चेहऱ्यावर यावेळी आनंदलहरी पाहायला मिळत होत्या. या खास दिवसासाठी तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. तर, निक पांढऱ्या रंगाच्या शेरवानीमध्ये तिला शोभून दिसत होता. उपस्थितांनीही यावेळी प्रियांका आणि निकला शुभाशिर्वाद दिल्याचं पाहायला मिळालं.
 
प्रियांकाचा साखरपुडा याआधीच पार पडला होता. पण, पारंपरिक पद्धतीने रोका पार पडल्यानंतर आता कलाकार मित्रमंडळींसाठी खास पार्टीचंही आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे प्रियांकाला शुभेच्छा देण्यासाठी आता नेमकं कोण हजेरी लावणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.