देशातील 'अटल' सूर्याच्या अंतयात्रेत जनसागर लोटला..

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Aug-2018
Total Views |
 
 
 
 
 
नवी दिल्ली : काल देशाचे माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन झाले. आज त्यांच्या निवासस्थानी आणि भाजपच्या मुख्यालयात त्यांच्या अंत्यदर्शनानंतर अखेर त्यांची अंतयात्रा शेवटच्या प्रवासासाठी निघाली आहे. त्यांचे दर्शन घेण्यासाठी आणि या अंतयात्रेत सहभागी होण्यासाठी जनसागर लोटला आहे. संपूर्ण देशातून भारतीय जनता पक्षाचे हजारो कार्यकर्ते आणि नागरिक आपल्या परम आदरणीय नेत्याच्या दर्शनासाठी जमा झाले आहेत. 
 
 
 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवासोबत पायदल चालत येतांना दिसत आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या देखील ज्या ठिकाणी अंतिम संस्कार केले जाणार त्या ठिकाणची माहिती घेत आहेत. आज संपूर्ण भाजप कार्यकर्ते आपले वडील गेले आहेत अशा स्थितीत काम पाहत आहेत. संपूर्ण देशात आज शोककळा पसरली असून दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश, आसाम, मणिपूर, ओडीसा येथून नागरिक अटल बिहारी वाजपेयी यांचे अंतिम दर्शन घ्यायला आले आहेत. 
 
 
 
 
देशाचे तिन्ही दल अटल बिहारी वाजपेयी यंच्या पार्थिवासोबत येतांना दिसत आहेत. काही क्षणात अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन होणार आहेत. घटनास्थळी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि सर्वच राजकीय मंडळी आपल्या लाडक्या नेत्याला शेवटचा निरोप देण्यास जमा झाले आहे. आजचा दिवस हा भारतीयांसाठी खूपच दुख:चा दिवस आहे. 
@@AUTHORINFO_V1@@