सांडपाण्याचा वापर करणारा राज्यातील पहिला प्रकल्प

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Aug-2018
Total Views |


 

 

नवी मुंबई : शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी विकण्याचा अनोखा निर्णय नवी मुंबई महापालिकेने घेतला आहे. सांडपाण्याचा वापर करण्याचा हा राज्यातील पहिला प्रकल्प ठरणार आहे. कोपरखैरणे ऐरोली या शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. यासाठी अमृत योजनेमधून ३८० कोटी ६४ लाख रुपयांचा प्रकल्पही उभारण्यात येणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने शहरात ४५४ एमएलडी क्षमतेची सात अत्याधुनिक मलनिस्सारण केंद्रे उभारली आहेत. कोपरखैरणे ऐरोली येथील मलनिस्सारण केंद्रातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ४० एमएलडी पाणी एमआयडीसीला देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या पाण्यावर प्रक्रिया करून ते विकण्याचा प्रस्ताव होता, परंतु प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्यासाठी यंत्रणाच नसल्यामुळे अनेक वर्षांपासून प्रक्रिया केलेले पाणी खाडीमध्ये सोडून द्यावे लागत आहे. पाण्याचा पुनर्वापर होत नसल्यामुळे टीकाही होऊ लागली होती.
 
महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी यासाठी केंद्र शासनाच्याअमृत मिशन प्रकल्पाअंतर्गत कोपरखैरणे ऐरोली मतप्रक्रिया केंद्रात प्रत्येक २० दशलक्ष लीटर क्षमतेचे टर्शिअरी ट्रीटमेंट प्रकल्प बांधणे, सर्वसमावेशक देखभाल-दुरुस्ती करणे चालविण्याचा प्रस्ताव तयार केला. पुनर्प्रक्रियायुक्त सांडपाणी टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील वाशी, कोपरखैरणे ऐरोली परिसरातील औद्योगिक वसाहतींना देण्याचे प्रस्तावित केले आहेअशाप्रकारे सांडपाण्याची विक्री करणारी नवी मुंबई ही राज्यातील एकमेव महापालिका ठरली आहे. पालिका १८ .५० टक्के घनमीटर दराने या पाण्याची विक्री करणार आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी टेक्टॉन इंजिनिअर्स अँड कन्स्ट्रक्शन कंपनीला ठेका देण्यात आला आहे.
@@AUTHORINFO_V1@@