मोफत आरोग्य शिबिराला डोंबिवलीतील नागरिकांचा उत्फुर्त प्रतिसाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Aug-2018
Total Views |


 

डोंबिवली :- नाहर मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल यांच्या माध्यमातून डोंबिवलीच्या कासा बेला गोल्ड क्लब हाऊस येथे नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे आयोजन श्री योगेश दराडे, श्री शैलेश सुर्वे यांनी केले होते. या शिबिरात सीबीसी, ईसीजी, रक्तातील साखरेचे प्रमाण, कॅन्सर, हिअरिंग टेस्ट, रक्तदाब व एचबी तपासण्यात आले.
 
 
या संपूर्ण शिबिराचा २२५ नागरिकांनी लाभ घेतला. या शिबिरात नाहर हॉस्पिटलच्या अत्यंत अनुभवी डॉक्टरांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन उपस्थित नागरिकांची आरोग्य तपासणी केली. या शिबिरात हॉस्पिटल मार्फत मोफत फॅमिली हेल्थ कार्डचे वाटप करण्यात आले. ज्यामध्ये हॉस्पिटलमधील वेगवेगळ्या डिपार्टमेंन्टमधे सवलती देण्यात आल्या आहेत. सदरचे शिबीर यशस्वीपणे पार पाडल्या बद्दल नाहर हॉस्पिटलच्या सर्व स्टाफचे मनःपूर्वक आभार मानले. सामाजिक ऋण व्यक्त करण्याच्या जाणिवेने डोंबिवलीतील नाहर मल्टी स्पेशलालिस्ट हॉस्पिटलने गोरगरीब व गरजू नागरिकांसाठी विविध आजाराच्या तपासणी साठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते .या शिबिराला नागरिकांनी उत्फुर्तपणे उपस्थित राहून विवीध आजाराची तपासणी केली.
@@AUTHORINFO_V1@@