माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन ...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Aug-2018
Total Views |


 
 
मानसकन्या नमिता यांनी दिला मुखाग्नि 
 
 
नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी अखेर अनंतात विलीन झाले. साश्रू नयनांनी त्यांच्या परिवाराने, भारतीय जनता पक्षाच्या सर्व दिग्गज नेत्यांनी आणि संपूर्ण राष्ट्राने त्यांना अखेरची श्रद्धांजली अर्पण केली. संपूर्ण राजकीय इतमामात त्यांच्यावर "स्मृति स्थळ" येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. देशाने आपला वीरपुत्र गमावला आणि संपू्र्ण राष्ट्र शोकसागरात बुडाले. 
 
 
 
 
 
आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी अर्थात ६ 'ए' कृष्णा मेनन मार्ग येथे त्यांचे पार्थिव शरीर अंत्यदर्शनास ठेवण्यात आले होते, यावेळी अनेक दिग्गज नेत्यांनी आणि जनसागराने त्यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर त्यांचे पार्थिव शरीर भाजपच्या मुख्य कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. येथे देखील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि देशाचे नागरिक उपस्थित होते. त्यांच्या अंत्ययात्रेत असंथ्य नागरिक सहभागी झाले. 
 
 
 
 
 
त्यांच्या मानसकन्या नमिता यांनी, त्यांना मुखाग्नि दिला. जनसंघ आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाला अक्षरशः शून्यातून उभा करण्यात सिंहाचा वाटा उचलणारे धुरंदर नेता, उत्कृष्ट संसदपटू, ओघवत्या शैलीत श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे प्रभावी वक्ता, संवेदनशील कवी, तीनवेळा देशाचे पंतप्रधानपद भूषवणारे अजातशत्रू राजकारणी आणि जवळपास ५० वर्षांहून अधिक काळ राजकारणात विरोधकांच्याही आदराचा विषय ठरलेले भारतीय राजकारणातील ‘स्टेट्समन’ अर्थात, ‘भारतरत्न’ अटलबिहारी वाजपेयी यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेले अनेक दिवस ते नवी दिल्लीतील एम्स रूग्णालयात उपचार घेत होते. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मालवली.
 

अखेर त्यांच्या या ओळीच मागे राहिल्या ..
 
मैं जी भर जिया, मैं मन से मरूँ, 
लौटकर आऊंगा, कूच से क्यों डरूँ? 
 
@@AUTHORINFO_V1@@