लोकसभेसह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकत्र होण्याची शक्यता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Aug-2018
Total Views |

मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी. रावत यांची माहिती




नवी दिल्ली : लोकसभा आणि विधानसभा यांच्या निवडणुका एकत्र घेणे तूर्तास जरी शक्य नसले तरी देखील येत्या डिसेंबर महिन्यामध्ये लोकसभेसह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकत्र घेतल्या जाऊ शकतात, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी. रावत यांनी आज दिली आहे. नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्यासाठी सर्वात प्रथम कायद्यात बदल करणे गरजेचे आहे. तसेच त्यानंतर पुरेशा इव्हीएम मशीन्स आणि सुरक्षा व्यवस्था पुरवल्यास निवडणुका एकत्र घेतल्या जाऊ शकतात. परंतु सध्या यातील कोणत्याही झालेल्या नसल्यामुळे लोकसभा आणि संपूर्ण देशाच्या विधानसभा निवडणुका एकत्र घेणे तूर्तास शक्य नाही. पण अशा स्थितीत देखील पुढील वर्षी देशात होणाऱ्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका मात्र लोकसभेसह घेता येऊ शकतात, असे रावत यांनी म्हटले आहे. तसेच याविषयी अद्याप कसल्याही ठोस निर्णय झालेला नसून सर्वांशी चर्चा केल्यानंतरच यावर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

निवडणुकांवर होणारा खर्च आणि प्रशासनावरील ताण कमी करण्यासाठी देशात 'एक देश,एक निवडणूक' घेतली जावी, अशी मागणी केली जात. विशेष करून मोदी सरकारकडून याविषयी सातत्याने मागणी केली जात आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी देखील नुकतेच याविषयी विधी आयोगाला पत्र लिहिले होते. त्यानंतर हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
@@AUTHORINFO_V1@@