‘औद्योगिक कीर्तना’द्वारे समाजसेवेची ‘गरुडझेप’
महा एमटीबी   16-Aug-2018नाशिकमधील 53 वर्षीय संदीप श्रीधर भानोसे यांनी मात्र दीर्घकाळापासून समाजसेवेचा वसा पुढे चालविला आहे. ‘औद्योगिक कीर्तनआणि गरुडझेपसारख्या माध्यमातून त्यांनी कार्य सुरू ठेवले आहे.

 

साधारणत: उच्च शिक्षण घेतले की माणूस समाजापासून दूर जातो. आपल्या उच्चभ्रू वर्तुळात तो रमू लागतो. काही व्यक्ती मात्र सामाजिक भान बाळगतात आणि समाजसेवेला वाहून घेतात. नाशिकमधील 53 वर्षीय संदीप श्रीधर भानोसे यांनी मात्र दीर्घकाळापासून समाजसेवेचा वसा पुढे चालविला आहे. ‘औद्योगिक कीर्तनआणि गरुडझेपसारख्या माध्यमातून त्यांनी कार्य सुरू ठेवले आहे. त्यांचे वडील ओझरला नोकरीला असल्याने, बारावीपर्यंतचे शिक्षण ओझरला गोखले एज्युकेशनच्या एच..एल. हायस्कूलमध्ये झाले. शाळेचे माध्यम इंग्रजी होते. एलिमेंटरी इंटरमिजीएट परीक्षेत अव्वल येऊन त्यांनी विशेष प्राविण्य मिळविले होते.

 

पुढे अभियांत्रिकीच्या अभ्यासाकरिता पुण्याला त्यांच्या काकांकडे (‘ताई-मावशीचे मालक) म्हणजे रिमांडहोममध्ये राहिले. ते तेथील प्रमुख होते. तिथे राहिल्यामुळे समाजातील गरीब मुले गुन्हेगारीकडे कशी वळतात? याचा अभ्यास त्यांनी केला. अभियंता झाल्यावर पहिली नोकरी नगर येथे युनिक्लींगरमध्ये मिळाली. दोन वर्षांच्या या काळात ते मावशीच्या घरी हडको येथे राहत होते. सायंकाळी नगर महाविद्यालयाच्या व्यवस्थापन विभागात सी.एस.आर.डी.मध्ये डी.बी.एमचाही अभ्यास करत असत. पुढे औरंगाबाद येथील बजाज ऑटोमध्ये त्यांना नोकरीची संधी मिळाली. त्याकाळात स्वाध्याय परिवारा विवेकानंद केंद्रा जात असत विविध विषयांवर ते संवाद साधत असत. प्रभाकर टेमकर यांची मुलगी संगीता हिच्याशी त्यांचे लग्न झाले.

 

बजाजसोडल्यावर काही काळ नाशिकच्या महेंद्र उद्योगा अधिकारी म्हणून संदीप भानोसे यांनी कार्य केले. पण, तिथे अल्पकाळ नोकरी केली. त्याच वेळी मुलगा श्रेयस याच्या मेंदूच्या अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. त्याला पूर्ण वेळ देता यावा म्हणून संदीपने नोकरी सोडली उद्योगात कीर्तने करण्याचे ठरविले. सुरुवातीला ही संकल्पना हास्यास्पद वाटली. नंतर मात्र त्यांनी समाजात रुजविली. त्या आधी अनेक ठिकाणी व्याख्याने देत ते संसार चालवत होते. नऊशे दिवसांनी पहिली व्यावसायिक संधी हिंदुस्तान लिव्हरइथे सिन्नरला सकारात्मक कार्य संस्कृतीया विषयावर कीर्तन करण्याची त्यांना लाभली. वेळ फक्त तीस मिनिटे दिली होती; परंतु, कीर्तन इतके रंगले की तीन तास केव्हा झाले ते कोणाच कळले नाही. सर्वांनी खूप कौतुक केले शाबासकी दिली. त्यानंतर मात्र त्यांनी परत मागे वळून पहिले नाही. आज 850पेक्षा अधिक उद्योगात जसे टाटा, महिंद्र, बजाज, एल.टी, क्रोंप्तन, वीज मंडळ, पाणी विभाग, परिवहन मंडळ, आयुर्विमा मंडळ, बँका, हॉटेल, रुग्णालये, पोलीस विभाग इत्यादींमध्ये कीर्तने केली. 1998 मध्ये मंत्रालयात ऊर्जा बचतयावर अनेक मंत्र्यांसमोर कीर्तन भारूड सादर केले. मुख्यमंत्री मनोहर जोशींना ते खूप भावले त्यांनी औद्योगिक कीर्तनकारही उपाधी बहाल केली.

 

पुढे गरुडावर संशोधन केले त्याचे 72 गुण शोधून काढले. त्यातील 40 गुण अनेक राष्ट्रीय पुरुषांमध्ये अर्थात, छत्रपती शिवाजी महाराज, वीर सावरकर, स्वामी विवेकानंद, डॉ. आंबेडकर इत्यादींमध्ये शोधले हे गुण दूरदृष्टी, नियोजनक्षमता, निर्णयक्षमता, प्रामाणिकपणा, बुद्धी, सुरक्षेचा विचार, परस्पर संबंध, प्रेरणा, अहंकार, नेतृत्व, सृजनशीलता, वेळेचे भान, राग, प्रगल्भता, स्वीकार, वात्सल्य इत्यादी महत्त्वाच्या व्यक्तिमत्वांमधील गुणांच्या टक्क्यांचे प्रमाण काढून शास्त्रोक्तपद्धतीने करिअर मार्गदर्शन ते करतात. त्यासाठी गरुडझेपप्रतिष्ठानची स्थापना केली. आजपर्यंत 1500 महाविद्यालये पाचशेहून अधिक शाळांमध्ये गरुडझेपकार्यशाळा घेतल्या आहेत. उद्योग, महाविद्यालये शाळा मिळून आजपर्यंत आठ लाख लोकांना प्रशिक्षण दिले आहे.

 

शेतकरी वर्गास प्रेरणा देण्यासाठी आत्मविश्वास वाढविण्यासाठी या अनेक कार्यशाळा घेतल्या आहेत. ‘महिला सबलीकरणयावर अनेक बचतगटांना मार्गदर्शन केले आहे. युवावर्गाने नोकरीच्या मागे लागता उद्योगनिर्मिती करावी यासाठी कार्यशाळा घेतल्या आहेत. सैन्यदलासाठीही काही विशेष कार्यशाळा घेतल्या आहेत. स्त्रीभ्रूणहत्या, पर्यावरण रक्षण, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती, प्लास्टिकमुक्ती, स्वच्छता मोहीम इत्यादी उपक्रम ते राबवत आहेत. गेले 140 दिवस ते नाशिकमध्ये वाहतूक सुरक्षेवर प्रबोधन ते करत आहेत. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी विशेष पुरस्कार देऊन त्यांना गौरव केला आहे. त्याचबरोबर त्यांना शेकडो पुरस्कार प्रशस्तिपत्रके मिळाली आहेत. अलीकडे राम खुर्दळ यांच्या शिवकार्य गडकिल्ले संवर्धन संस्थेच्या माध्यमातून 65 स्वच्छता संवर्धन मोहिमा त्यांनी यशस्वी केल्या आहेत. अनेक गडकिल्ल्यांवर दारूच्या बाटल्या, प्लास्टिक कचरा गोळा केला आहे. तीनशेहून अधिक पाण्याच्या टाक्या साफ केल्या आहेत जलसंधारण कार्यास हातभार लावला आहे. अशाप्रकारे समाजसेवेचा आगळा आदर्श संदीप भानोसे यांनी उभा केला असून त्यांच्या भावी कार्याला शुभेच्छा!