ध्यानचंद पुरस्कार विजेते हकम सिंह भट्टल यांचे निधन
महा एमटीबी   14-Aug-2018

 

 
 
सिंगरुर (पंजाब) : एशियन चॅम्पियनशिप विजेते आणि ध्यानचंद पुरस्काराने सम्मानित करण्यात आलेले प्रसिद्ध हॉकीपटू हकम सिंह भट्टल यांचे आज सिंगरुर येथील एका रुग्णालयात निधन झाले. प्रदीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी देशासाठी सुवर्ण पदकाची कमाई केली होती.
 
 
 

आर्थिक अडचणींमुळे त्यांना उपचारासंबंधी अनेक समस्यांना सामोरे जावे लागले, त्यावेळी त्यांचे नाव चर्चेत आले होते. तसेच देशासाठी महत्वाची कामगिरी करुन देखील त्यांना अशा परिस्थितीला का सामोरे जावे लागत आहे, असे प्रश्न देखील उपस्थित करण्यात येत होते.

हकम सिंह यांनी देशासाठी नेहमीच मोठी कामगिरी केली आहे. ते भारतीय सेनेत देखील दाखल झाले होते. ते १९७२ मध्ये ६ सिख रेजीमेंट मध्ये हवालदार पदावर कार्यरत होते. २९ ऑगस्ट २००८ रोजी त्यांना तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते ध्यानचंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.