विराटने गमावले कसोटीतले अव्वल स्थान
महा एमटीबी   14-Aug-2018 

दिल्ली : क्रिकेटपटू विराट कोहलीने दुसऱ्या कसोटी सामान्याबरोबरच आपले अव्वल स्थान गमावले आहे. जागतिक कसोटी सामन्याच्या क्रमवारीत त्याची दुसऱ्यास्थानी घसरण झाली आहे. सध्या चालू असलेल्या इंग्लंड विरुद्ध भारताच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दोन्ही डावांमध्ये काही खास कमाल दाखवू शकला नाही. त्यामुळे हि नामूस्की त्याच्यावर ओढवली आहे.

 

सध्या बॉल टेम्परिंगच्या आरोपामुळे बाहेर असलेला स्टिव्ह स्मिथला मात्र कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळालं आहे. आगामी कसोटी सामन्यात जर विराट कोहली ने आपली कामगिरी नाही सुधारली तर त्याला कसोटी क्रमवारीतील पहिल्या दहा मधील स्थान सुद्धा गमवावे लागेल. त्याच बरोबर जर टीम इंडिया ची कामगिरी चांगली नाही झाली तर भारताला हि जागतिक कसोटी क्रिकेट मधला आपला पहिला स्थान गमवावं लागेल.