अमर फोटो स्टुडिओत होणार पर्ण पेठेची एन्ट्री
महा एमटीबी   14-Aug-2018

 

 
 
 
मुंबई : रंगभूमीवरील सुप्रसिद्ध नाटक ‘अमर फोटो स्टुडिओ’ला अभिनेत्री सखी गोखले हिने रामराम ठोकला आहे. नाटकातील तिची भूमिका आता अभिनेत्री पर्ण पेठे साकारणार आहे. काही दिवसांपूर्वीच सखीने ट्विटरवरून याविषयी माहिती दिली होती. अमर फोटो स्टुडिओ या नाटकाचे २५० प्रयोग पूर्ण होणार होते. परंतु या नाटकातील एक कलाकार सोडून जात असल्याबद्दल तिने ट्विट केले होते.
 

 
 
 सखी उच्च शिक्षणासाठी परदेशी जात असल्याने तिने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेपासून प्रेक्षकांनी सखीला भरभरून प्रेम दिले आहे. आता या नाटकातील सखीची जागा पर्ण पेठे घेत असल्याने प्रेक्षक तिलाही सखीप्रमाणेच पसंती देतात का हे मात्र पाहण्याजोगे असेल! नाटकातून एक्झिट घेण्यापूर्वी सखीने व पर्ण पेठेने एकत्र छान फोटोही काढला.