इम्रान खानच होणार पाकिस्तानचे पंतप्रधान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Aug-2018
Total Views |
 
 
 
 
 
पाकिस्तान : माजी क्रिकेटपटू आणि तेहरीक-ए-इंसाफ पक्षाच्या पंतप्रधान पदाचे उमेद्वार इम्रान खान यांच्या नावावर पाकिस्तानचे पंतप्रधान पद शिक्कामोर्तब झाले आहे. २६ जुलैला पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणूकीसाठीची मतमोजणी झाली होती या मतमोजणीत तेहरीक-ए-इंसाफ पक्षाला सगळ्यात जास्त मत मिळाली होती. त्यामुळे इम्रान खान हे या पक्षाच्या पंतप्रधान पदाचे उमेद्वार असल्याने यांचे नाव पंतप्रधानपदी येणार होते.
 
 
 
काही राजकीय कलहामुळे इम्रान खान यांना पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्यास विरोध दर्शिविला जात होता मात्र, आता पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने ४ संसदीय मतदारसंघातून इम्रान खान यांना विजेता घोषित केले असल्याने पाकिस्तानचे नवीन पंतप्रधान म्हणून शपथ घेण्यास इम्रान खान याचा मार्ग मोकळा झाला आहे. तेहरीक-ए-इंसाफ पक्षाचे इम्रान खान हे अध्यक्ष आहेत.  
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@