नाशिक मध्ये IOTकार्यशाळा
महा एमटीबी   10-Aug-2018
नाशिक :- येथील संदीप फॉऊंडेशन संचालित संदीप इन्स्टीट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात कॉम्प्युटर डिपार्टमेंट तर्फे दिनांक २७ जुलै ते ऑगस्ट २०१८ रोजी पाच दिवसाची "इंटरनेट ऑफ थिंग्स" ही कार्यशाळा व्दितीय वर्ष्याच्या विद्यार्ध्यांसाठी यशस्वीपणे आयोजित करण्यात आली.

कार्यक्रमाचे उदघाटन कॉग्निफ्रन्ट प्रा. लिमिटेड कंपनीचे संचालक डॉ. आर. एस. तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्यडॉ.आर.व्ही.क्षीरसागर यांनी डॉ. तिवारी सरांचा सत्कार केलायावेळी प्राचार्य डॉ. आर. व्ही. क्षीरसागर यांनी विद्यार्थांना कार्यशाळेचा लाभ घेऊन जास्तीत जास्त ऍप्लिकेशन्स तयार करून त्याचे पेटंट मिळवावेत असे आवाहन केले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. व्ही. क्षीरसागर, विभागप्रमुख डॉ. के. सी. नलावडे मॅडम, स्टाफ आणि विद्यार्थी उपस्तिथ होते.कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे चेअरमन डॉ. संदीपकुमार झा यांनी आयोजकांचे आभार मानले.