पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस
महा एमटीबी   10-Aug-2018
 
 
 
 
 
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज राज्यसभेत तीन तलाक सुधारणा विधेयक सादर करण्यात येणार आहे. या विधेयकाच्या सादरीकरणासोबत यावर्षीचे पावसाळी अधिवेशन समाप्त होणार आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाने तीन तलाक विधेयकातील तीन सुधारणांना मंजुरी दिली असल्याने हे विधेयक आज चर्चिले जाणार आहे. आज या विधेयकावर चर्चा होणार असून यात सुधारणा सुचविल्या जाणार आहे. 
 
 
 
संसदेच्या सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात दोन अत्यंत महत्त्वपूर्ण व आगामी भारतीय राजकारण व समाजकारणाला कलाटणी देणारी विधेयके पारित झाली आहेत. याच आठवड्यात पारित झालेले मागासवर्गीय आयोगाला वैधानिक दर्जा देण्याची घटनेतील १२३ व्या घटनादुरुस्ती असलेले विधेयक व आज पारित झालेले अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार विरोधी विधेयक ही दोन महत्त्वपूर्ण विधेयके या अधिवेशनात पारित करून घेण्यात केंद्र सरकारला यश आले आहे.