किल्ल्यांची राखणदार!
महा एमटीबी   10-Aug-2018टोलेजंग इमारती आणि झोपडपट्ट्यांनी विद्रुप झालेल्या मुंबई शहरात दडलेल्या किल्ल्यांचे विदारक चित्र काही अंशी तरी बदलावे यासाठी मुंबईतील बाप-लेकीची एक जोडी प्रयत्नशील आहे. त्यांच्याविषयी...

 

मुंबई  म्हटले की, पहिले चित्र डोळ्यांसमोर दिसते ते मुंबईला लाभलेल्या विस्तीर्ण समुद्र किनाऱ्या चे आणि दुसरे अर्थात टोलेजंग इमारती आणि अथांग गर्दी. आता या मुंबईमध्येच किल्ले आहेत, असे कोणी म्हटले तर नक्कीच कितीतरी लोकांच्या चेहऱ्या वर प्रश्नचिन्ह दिसेल. ब्रिटिशकाळापासून मुंबई हे नेहमीच महत्त्वाचे शहर, व्यापारी केंद्र म्हणून उदयास आले. नैसर्गिक बंदर असलेल्या या शहराचा भरभराटीसाठी पुरेपूर वापर केला गेलाबऱ्याच ब्रिटिशकालीन वास्तूही या मुंबईत उभ्या आहेत. त्यातलचे एक मुंबईतले किल्ले. शीवचा किल्ला, माहिमचा किल्ला, धारावीचा काळा किल्ला, वरळीचा किल्ला, शिवडी आणि वसईचा किल्ला असा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक वारसाही मुंबईला लाभला आहे. मात्र, शहरीकरणामुळे गजबजलेल्या या किल्ल्यांचा श्वास कोंडत चालला आहे. दाट वस्ती, झोपडपट्टी, आजूबाजूला असलेला प्रचंड कचरा आणि भटक्यांची अनास्था अशा अनेक कारणांमुळे हे किल्ले शेवटचा श्वास घेत आहेत. या किल्ल्यांवरून ना दिसते सह्याद्रीचे रौद्र रूप ना दिसतो दरी-खोऱ्या सारखा अप्रतिम नजारा; दिसते ते केवळ टोलेजंग इमारती आणि झोपडपट्ट्यांनी विद्रुप झालेले शहर. हे चित्र काही अंशी तरी बदलावे यासाठी मुंबईतील बाप-लेकीची जोडी प्रयत्नशील आहे.


२००९ साली कोमल घाग यांनी त्यांचे वडील तानाजी घाग मार्गदर्शनात आपल्या निकटवर्तीयांसमवेतसंगम प्रतिष्ठानची स्थापना केली. “चांगल्या कामाची सुरुवात कधीही स्वत:च्या घरापासून करावी,” या विचारानेच कोमल घाग यांनी आपल्या कामाची सुरुवात केली. वडील महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामध्ये कामाला असल्यामुळे प्रशासकीय सेवेतील कामाला स्वयंसेवकाची कशी मदत होऊ शकते या बाबतीत ते तिला हवी ती मदत ते करत असतात. मात्र, समाजात कोणतेही बदल लगेच होत नाही, संयमाने आपण काम करत राहायचे, बदल आपोआप दिसेल, हा आपल्या वडिलांचा कानमंत्र सोबत घेऊन कोमल आपल्या कामाला लागल्या. “कचऱ्या चे वर्गीकरण करा, असे प्रशासन सांगून थकले तरी लोक या गोष्टी मनावर घेत नाही आणि त्याचे परिणाम म्हणजे मुंबईतील पूरस्थिती. मग असे असेल, तर त्याची सुरुवात कुठून तरी झाली पाहिजे, असा विचार मी केला,” असे कोमल सांगतात. २००९ -१० च्या दरम्यानसंगम प्रतिष्ठानने एमएमआरडीए अंतर्गत साचलेल्या कचऱ्या चे वर्गीकरण आणि साचलेल्या पाण्यामुळे होणारी रोगराई या विषयावर जवळजवळ ११० पथनाट्य करून लोकांना जागरुक केले. ‘सोशल वर्कचे रितसर शिक्षण घेत असताना कोमल यांनी अनेक दौरे केले, या दरम्यान त्यांना मुंबईतील कचरावेचकांच्या समस्याही जाणवल्या. यासाठी काही तरी केले पाहिजे, या विचाराने त्यांनी याच लोकांचा वापर शहर स्वच्छ करण्यासाठी केला आणि आतासंगम प्रतिष्ठानतर्फे ८० कचरावेचकांना पगारी काम दिले जाते.

 

मुंबई हे नैसर्गिक बंदर असल्यामुळे, समुद्रालगत असणारी सर्व ठिकाणे, पर्यटकांनी गजबजलेली असतात, पण माझ्या मुंबई भ्रमंती दरम्यान कमी नावाजलेल्या पण ऐतिहासिक महत्त्व असलेल्या शीव किल्ल्याला भेट दिली आणि तिथून किल्ले सफाईच्या कामाला सुरुवात झाली,” असे कोमल म्हणाल्या.खरेतर आपण घरापासून लांब असणाऱ्या किल्ल्यांचे संवर्धन करत असतो, पण आपल्या अंगणात असलेलीही वारसास्थळे मात्र उपेक्षित राहतात. या किल्ल्यांनाही कोणीतरी भेट द्यावी, या कारणाने दि. मे रोजी, कामगारदिनानिमित्तसंगम प्रतिष्ठानने संपूर्ण किल्ल्याच्या साफसफाईचे पुरातत्व विभागाच्या परवानगीने काम हाती घेतले. मे, जुलै या दोन महिन्यांत सलग सहा आठवडे त्यांनी संपूर्ण किल्ला साफ केला. एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत, तर त्यांनी आपल्या मित्रांसमवेत शीव किल्ल्यांतर्गत गांडूळ खत तयार करण्यास सुरुवात केली आणि आजच्या तारखेला एकट्या शीव किल्ल्यावर त्यांचे दोन गांडूळ खत प्रकल्प आहेत. “मैत्रीचा दिन मित्रांसोबत सादर करतो, पण मग वृक्ष हेही आपले मित्र आहेत. म्हणून आम्ही शीव किल्ल्यावरचे वृक्षांना फ्रेंडशिप बॅण्ड बांधले. माझ्यासाठी तेच माझे मित्र,” असे कोमल आनंदाने सांगतात. पालिका आपले काम करेल, नाही करेल, कमी पडेल, पण या शहराचा एक भाग म्हणून आपण मुंबईची साफसफाई केली पाहिजे,असं आपण आपल्यातचं निश्चय करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे किल्ल्यांना गतवैभव प्राप्त करून देणे ही सुध्दा आपली जबाबदारी आहे, असे समजून प्रत्येकाने एक दिवस तरी या किल्ल्यांना दिला, तरच या गर्दीत हे किल्ले उठून दिसतील.