कृषी दूतांनी केले लासलगावी मार्गदर्शन कृषी दूतांनी केले लासलगावी मार्गदर्शन
कृषी दूतांनी केले लासलगावी मार्गदर्शन
महा एमटीबी   10-Aug-2018 

नाशिक: कृषी महाविद्यालय,बाभूळगाव(येवला)येथील कृषीदूतांनी ब्राम्हणगाव(वि.)येथील शेतकऱ्यांना बोर्डो मिश्रण व जनावरांचे लसीकरण याविषयी शेतकऱ्यांना उपकुक्त माहिती देऊन मार्गदर्शन केले. या प्रसंगी ब्राम्हणगाव येथील शेतीउपयुक्त जनावरांमध्ये अशक्तपणा आढल्यामुळे कृषिदूत भोरडे तुषार,घुगे तेजस,कोळी अक्षय,गीते दीपक,भास्कर पालगणी,नरेंद्र अलापती,होळंबे अमोल यांनी लसीकरणाचे प्रभोधन केले.याप्रसंगी व्हेटरनरी डॉ.बोडखे व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

द्राक्षबागेवर वाढत असलेल्या बुरशी चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कृषिदूतांकडून बोर्डो मिश्रण तयार करून त्याचे प्रात्याक्षिक शेतकऱ्यांना दिले. ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमासाठी डॉ.दिनेश कुळधर सर,डॉ.एस डी पाटील सर व डॉ. एस सी वाडीले सर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.