अभिनेत्री फ्लोरा सैनीचे ‘परी हूँ मैं’ मधून मराठी चित्रपटात पदार्पण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Aug-2018
Total Views |
 
 
मराठी चित्रपट त्याच्या आशय संपन्नतेसाठी देश पातळीवर ओळखला जातो. आशयसंपन्न आणि वेगळेपण यामुळेच विविध प्रादेशिक सिनेमा आणि बॉलीवूड मधील आघाडीचे कलाकारही मराठीमध्ये काम करण्यास उत्सुक असतात. दाक्षिणात्य आणि बॉलीवूडमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेली अभिनेत्री फ्लोरा सैनी आता मराठी चित्रपटात दिसणार आहे. योगायतन फिल्मस प्रस्तुत ‘परी हूँ मैं’ या आगामी मराठी चित्रपटातून फ्लोरा सैनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.
 
उर्जा, पोर्ट, रिअल इस्टेट, निर्यात, टाउनशीप आदी क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या योगायतन ग्रुपचे प्रमुख डॉ. राजेंद्र प्रताप सिंह आणि शीला सिंह यांनी ‘परी हूं मैं’ची निर्मिती केली असून रोहित शिलवंत या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. चित्रपटाची कथा इरावती कर्णिक यांची असून संगीत समीर सप्तीसकर यांचे आहे.
 
फ्लोरा सैनी या चित्रपटात एका सिने अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे, तिने आपल्या कारकीर्दीची सुरुवात तेलगु चित्रपटातून केली, त्यानंतर तमिळ, कन्नड, पंजाबी आणि हिंदी भाषेत ५० हून अधिक चित्रपटातून वैविध्यपूर्ण भूमिका साकारत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘लव्ह इन नेपाल’, ‘दबंग २’, ‘बेगमजान’, ‘धनक’ आदी हिंदी चित्रपटातील फ्लोराच्या भूमिका विशेष गाजल्या. दिघे कुटुंब आणि टीव्ही मालिका, रियालीटी शो भोवती फिरणाऱ्या अत्यंत मनोरंजक अशा ‘परी हूँ मैं’ मध्ये फ्लोरा सैनीसह अभिनेते नंदू माधव, देविका दफ्तरदार, बालकलाकार श्रुती निगडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
 
टीव्हीच्या छोट्या पडद्याने सामान्य माणसाचे जीवन व्यापून टाकले आहे, याच ग्लॅमरस दुनियेची अत्यंत हटके सफर घडविणारा ‘परी हूँ मैं’ हा मराठी चित्रपट येत्या ७ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@