महिला हॉकी विश्वचषक : महिला हॉकी संघाची उपांत्यपूर्व फेरीत धडक
महा एमटीबी   01-Aug-2018
 
 
 
 
लंडन : भारतीय महिला संघाने महिला हॉकी विश्वचषक २०१८ स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. काल इटलीसोबत भारताचा मुकाबला झाला, त्या सामन्यात भारतीय महिला संघाने इटलीला ३-० अशा गोल संख्येने मागे टाकले. इटलीला या सामन्यात गोलाचे खातेच उघडू न देता भारताने अतिशय चांगला खेळ खेळत हा सामना आपल्या नावावर करून घेतला. त्यामुळे आता भारताने या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरी धडक मारली आहे. 
 
 
 
 
प्लेऑफ सामन्यात भारताने इटलीला मात देत अंतिम आठमध्ये भारताने जागा बनविली असून आता येत्या गुरुवारी भारताचा सामना आयर्लंडसोबत होणार आहे. महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या शेवटच्या ग्रुप सामन्यात भारताने अमेरिकेला १-१ अशा समान गोलवर रेटून धरले होते त्यामुळे यामुळे भारताने प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. हाच सामना काल खेळला गेला यात इटलीवर मात करत भारत पुढे सरकला आहे.