आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु होणार कसोटी सामना
महा एमटीबी   01-Aug-2018
 
 
 
 
इंग्लंड : आजपासून इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांचा कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघ उत्तम प्रदर्शन करेल असे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने सांगितले आहे. आज पासून या कसोटी सामन्याला सुरुवात होणार असून या सामन्यांसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या सामन्यांसाठी भारतीय संघ सराव करत होता आता आजपासून हे सामने सुरु होणार आहेत. 
 
 
 
पहिला सामना आजपासून सुरु होणार असून यापुढील सामना ९ ऑगस्टला खेळला जाणार आहे तर १८ ऑगस्टला तिसरा, ३० ऑगस्टला चौथा व ७ सप्टेंबरला पाचवा सामना खेळला जाणार आहे. आता या सामन्यांमध्ये कोणता संघ जिंकतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.