गुगलने काढली मीना कुमारी यांची आठवण
महा एमटीबी   01-Aug-2018
 

 
 
 
प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री मीना कुमारी याचा आज ८५ वा वाढदिवस आहे. आजच्या या दिवसाची आठवण करत गुगलने डूडलच्या स्वरुपात मीना कुमारी यांना मानवंदना दिली आहे. मीना कुमारी २० व्या शतकातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखल्या जायच्या त्यांच्या अभिनयाने सिनेसृष्टीतील कलाकारांना आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले होते. त्या काळातील मीना कुमारी या ‘हावभावाची राणी’ म्हणून ओळखल्या जायच्या. 
 
 
 
मीना कुमारी यांचे खरे नाव 'महजबीन बानो' होते. मीना कुमारी या अभिनेत्री, गायिका व कवयित्री होत्या. मीना कुमारी यांनी 'नाझ' हे टोपणनाव धारण केले होते. तसेच, अनेक चित्रपटात शोकात्मक व शोकांतक भूमिका केल्यामुळे, त्यांना 'ट्रॅजेडी क्वीन' ही म्हणत होते. त्यांना कधीकधी भारतीय चित्रपटांची ‘सिंड्रेला’ असेही संबोधण्यात येत होते. मीना कुमारी यांना सन १९५४, १९५५, १९६३, १९६६ या वर्षींचा फिल्मफेअरचा सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार ४ वेळा मिळाला होता.