व्हयी जाऊ द्या खर्च? गण शे घरनं
महा एमटीबी   01-Aug-2018
 
 
 
गम्प्या : महापालिका निवडणूकना सोमवारेस प्रचार सरी गया
 
टम्प्या : तेनामुळे आते उमीदवारेसले काही थेट लोकेसले भेटता येत नही कारण प्रचार बंद व्हयी जायेल शे.
 
गम्प्या : पण तुले माहीत शे का, उमीदवार काय म्हणी रायनात
 
टम्प्या : काय म्हणी रायनात त्या.
 
गम्प्या : उमीदवार म्हणतस आते व्हयी जाऊ द्या खर्च, गण शे घरनं, नही तर काढी आणसू कर्ज.
 
टम्प्या : अरे भाऊ हाई भी बरबरा शे. कारण खर्च करी तरस खरं शे. नाही तर काही खरं नही
 
गम्प्या : काय बराबर बोलना तू
 
टम्प्या : सध्या शहरमा गुपचूप गुपचूप पैसा वाटानी चर्चा शे.
 
गम्प्या : हा खरं शे.
 
टम्प्या : शहरमधला काही भागमा पैसा वाटताना काही जण सापडी जायेल शे.
 
गम्प्या : तेनामुळे काही ठिकाणी मारामार्‍या व्हयल शे.
 
टम्प्या : हा रातले तेनीच चर्चा व्हती शहरमा
 
गम्प्या : लोके तेस मनी रायना व्हतात, रातले.
 
टम्प्या : हा आते समजनं माले रातले काय भानगड व्हती.
 
गम्प्या : जाऊ दे उमीदवार निवडासाठे मोठाच खर्च करी रायनात.
 
टम्प्या : त्या रात-दिन कार्यकर्त्यासले चोरी लपी भेटीसन लोकेसपर्यंत पोहची रायनात
 
गम्प्या : काबरं असं
 
टम्प्या : अरे मंगळवार शेवटना दिवस शे.
 
गम्प्या : बुधवारले मतदान शे.
 
टम्प्या : हा आते उनं लक्षामा.
 
गम्प्या : अरे सगळा कार्यकर्त्यांसना गर्दी दिशी रायनी
 
टम्प्या : हा शहरामाधल्या हॉटेलभी गर्दीनी फुल व्हयी जायेल शे.
 
गम्प्या : उमीदवारेसना कार्यकर्ता शहरभर इकडे तिकडे फिरी रायनात
 
टम्प्या : शहरमा कोठे काय चालू शे. वातावरण काय म्हणसं
 
गम्प्या : हा यनी माहिती त्या ली रायनात.
 
टम्प्या : सध्या शहरनं वातावरण निवडणूकना पायरे तापेल शे.
 
गम्प्या : हा शहरमा जागाजागावर पोलीसशेसना बंदोबस्त शे.
 
टम्प्या : निवडणूकमा कोठे काही चुकीनं घडाले नको यनासाठे पोलीस ध्यान ठी रायनात
 
गम्प्या : निवडणूकना केंद्रासले बंदोबस्त लायेल शे.
 
टम्प्या : तेनासाठी पोलीस आयुक्तासनी जास्तीना बंदोबस्त मांघाडेल शे.
 
गम्प्या : शहरमधला काही मतदान केंद्रासवर इशेष बंदोबस्त शे.
 
टम्प्या : काही चुकीनं गडाले नको यनी कायजी पोलीस ली रायनात.
 
गम्प्या : अरे सकाये मतदान शे. तेनापायरे समदा पक्ष तसा पलॅन करी रायनात
 
टम्प्या : तेसना कार्यकर्ता गुपचूप फिरी रायनात शहरमा
 
गम्प्या : निवडणूकमा काही उमीदवार कोट्यधीश शे.
 
टम्प्या : तेनामुळे लक्ष्मीदर्शननी चर्चा शे.
 
गम्प्या : हाई निवडणूकमा राजकारनीसनी प्रतिष्ठा ना सवाल शे.
 
टम्प्या : तेनामुळे बुधवारे लोके तेना फैसला करी टाकव शे.
 
गम्प्या : भाजपा आणि सेनामा काटानी टक्कर शे
 
टम्प्या : तेनाकडे जिल्ह्यानं नही तर राज्यानं ध्यान लागेल शे. लोकेभी उत्सुक शे.