निर्भया प्रकरण : सर्वोच्च न्यायालय मांडणार आपला निर्णय
महा एमटीबी   09-Jul-2018
 
 
 
 
अपराध्यांच्या पुनरावलोकन याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणार निर्णय 
 
 
नवी दिल्ली : २०१२ मध्ये झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देशाला हादरविले होते. आता याच प्रकरणावर आज पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे. अपराध्यांच्या पुनरावलोकन याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आपला निर्णय जाहीर करणार आहे. निर्भया सामुहिक हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देशात रागाची लाट पसरली होती. 
 
 
 
मागील वर्षी या प्रकरणात चारही दोषींना सर्वोच्च न्यायालयाकडून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या याच सुनावणीवर चारही दोषींनी न्यायालयात पुनरावलोकन याचिका सादर केली होती. आता याच याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आपला निर्णय देणार आहे. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने मागील वर्षी या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र यावर आरोपींनी पुनरावलोकन याचिका दाखल केली त्यामुळे सध्या देशात यावर संताप व्यक्त केला जात आहे. 
 
 
 
नवी दिल्लीतील मेडिकल कॉलेजची विद्यार्थांनी असलेल्या निर्भया उर्फ ज्योती सिंग या विद्यार्थिनीवर १६ डिसेंबर २०१२ रोजी चालत्या बसमध्ये या चारही आरोपींनी अत्याचार केला होता. यानंतर निर्भयाचा सिंगापूर येथे उपचार दरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण देशभरातून आरोपांवर कारवाईची मागणी केली जात होती. दिल्ली उच्च न्यायालयाने सर्व आरोपींना फाशीची शिक्षा दिली होती. 
 
 
या शिक्षेनंतर आरोपींच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयकडे माफीसाठी अर्ज करत, आरोपींची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहून त्यांना सुधारण्याची एक संधी देण्यात यावी अशी मागणी न्यायालयाकडे केली होता. न्यायालयाने यावर सुनावणी करण्यासाठी तीन न्यायाधीशांची नियुक्ती केली होती. तसेच फास्ट ट्रॅक कोर्टप्रमाणे गेले ४४ दिवस यावर सुनावणी केली जात होती.