Happy Birthday M.S. Dhoni : सोशल मिडियावर शुभेच्छांचा वर्षाव
महा एमटीबी   07-Jul-2018
 

 
 
 
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सगळ्यांचा आवडता क्रिकेटर ‘माही’ अर्थात एम.एस.धोनी याचा आज ३७ वा वाढदिवस आहे. ‘कॅप्टन कुल’ अशी धोनीची ओळख आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. धोनीने आपल्या पत्नी आणि मुलीसोबत आजचा वाढदिवस साजरा केला आहे. 
 
 
 
 
 
सोशल मिडियावर धोनीवर शुभेच्छांचा वर्षाव होतांना दिसत आहे. धोनीचा फॅन क्लब धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना दिसत आहेत.