इंडोनेशिया बॅडमिंटन : सिंधु आणि प्रणव उपांत्यपूर्व फेरीत दाखल
महा एमटीबी   06-Jul-2018
इंडोनेशिया :
येथे सुरु असलेल्या इंडोनेशिया बॅडमिंटन ओपन -२०१८ या स्पर्धेत भारताची स्टार शटलर पी.व्ही.सिंधू आणि प्रनॉय या दोघांनीही अनुक्रमे महिला एकेरी आणि पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये धडक मारली आहे.

महिला एकेरीच्या काल झालेल्या दुसऱ्या फेरीमध्ये सिंधू हिच्या समोर जपानच्या अया ओहोरी हिचे आव्हान होते. या खेळामध्ये सिंधूने ओहोरीचा अवघ्या दोन सेटमध्ये २१-१७, आणि २१-१४ अशा गुणांनी पराभव केला. तर पुरुष एकेरीमध्ये प्रनॉय समोर तैवानच्या वांग झु वेई याचे आव्हान होते. या खेळामध्ये प्रनॉयने देखील २१-२३, २१-१५, २१-१३ अशा गुणांनी वंगचा पराभव करत, उपांत्य फेरीत धडक घेतली आहे.दरम्यान भारताकडून पुरुष एकेरीमध्ये खेळत असलेल्या किदमी श्रीकांत याला मात्र पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीमध्येच पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत आलेल्या समीर वर्माला देखील पराभव पत्करावा लागला आहे.. महिला एकेरीमध्ये देखील हीच परिस्थिती असून सायना नेहवाल हिचा चीनच्या चेन यूफई हिने दुसऱ्या फेरीमध्ये पराभव केले आहे.