अनुपम खेर आणि 'द अॅक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर'
महा एमटीबी   05-Jul-2018


 
 
नवी दिल्ली : 'द अॅक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर' या चित्रपटाचे चित्रीकरण आज संपले आहे. आणि या निमित्ताने अनुपम खेर यांनी आपला या चित्रपटासंबंधीचा अनुभव सगळ्यांसोबत मांडला आहे. 'द अॅक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर' चित्रपटात त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट संजय बारुआ यांच्या पुस्तकावर आधारित आहे.
 
 
 
 
अनुपम खेर यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून आपला अनुभव सांगितला आहे. " दिल्ली या शहरात चित्रीकरणाचा अनुभव खूपच सुंदर होता. येथे मी अभिनयाबद्दल खूप काही शिकलो. या शहरातील काही कलाकारांसोबत काम करून खूप शिकण्यास मिळाले. धन्यवाद दिल्ली." असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
 
चित्रपटात १४० पेक्षा जास्त कलाकार राजकारण्यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे लेखन मयंक तिवारी यांनी केले आहे. तर दिग्दर्शन विजय रत्नाकर गुट्टे यांनी केले आहे. हा चित्रपट २१ डिसेंबर २०१८ ला प्रदर्शित होणार असून खेर यांचे चाहते या चित्रपटाची बघत आहेत.