फिरोजाबाद येथे संघाच्या महानगर पर्यावरण प्रमुखांची हत्या
महा एमटीबी   04-Jul-2018

 
 
उत्तरप्रदेशच्या फिरोजाबाद येथे काल रात्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महानगर पर्यावरण प्रमुख संदीप शर्मा यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बाईकवर आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची हत्या केली. त्यावेळी ते घराबाहेर शतपावली करत होते.
 
गोळ्या लागल्यानंतर ते रक्ताच्या थारोळ्यात पडले असताना त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र तेथे त्यांची प्राणज्योत मालवली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. भाजपचे देखील अनेक कार्यकर्ते यावेळी रुग्णालयात पोहोचले.
 
या हत्येमुळे लोकांच्या मनात नाराजी आहे, तसेच या घटनेमुळे तेथील नागरिकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्येचे कारण अद्याप समजलेले नाही. पोलिस गुन्हेगारांच्या तपासात लागले आहेत.