श्रीदेवीच्या आठवणीत भावुक झाले बोनी कपूर
महा एमटीबी   31-Jul-2018

 
 
मुंबई :  श्रीदेवी यांच्या निधनाने संपूर्ण देशाला हादरवून टाकले होते. मात्र याचा सगळ्यात मोठा धक्का बसला तो म्हणजे त्यांच्या पती आणि त्यांच्या कुटुंबियांना. श्रीदेवी यांच्या निधनानतंर त्यांना प्रसिद्ध आयफा अवॉर्ड्स मध्ये सर्वोत्कृष्ट नायिकेचा पुरस्कार 'मॉम' या चित्रपटासाठी मिळाला. हा पुरस्कार घेण्यासाठी मंचावर आल्यानंतर श्रीदेवी यांच्या आठवणीत त्यांचे पती बोनी कपूर यांना अश्रु अनावर झाले.
 
 
 
 
 
"मला तिची आठवण माझ्या आयुष्याच्या प्रत्येत क्षणी येते. मला वाटतं, ती अजूनही माझ्या जवळ आहे." असे म्हणत ते भावुक झाले, यावेळी मंचावर बोनी कपूर यांचा मुलगा अर्जुन देखील उपस्थित होता, तसेच त्याला देखील अश्रु अनावर जाले. "ज्याप्रमाणे जान्हवीच्या आईला म्हणजेच श्री ला तुम्ही प्रेम दिलंत, तसंच प्रेम जान्हवीला देखील द्या" असे आवाहन यावेळी बोनी कपूर यांनी चाहत्यांना केले.
 
 
 
 
बोनी कपूर आणि श्री देवी यांचे लग्न झाल्या पासून ते चर्चेत होते. तसेच अर्जुन कपूर देखील या क्षेत्रात उतरल्यानंतर चर्चांना उधाण आले होते. श्रीदेवी यांच्या मृत्युसंबंधी देखील अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र त्यांच्या मृत्युनंतर अनेक कार्यक्रमांच्या ठिकाणी, समारंभांमध्ये इर्जुन, अंशुला, जान्हवी आणि खुशी कपूर हे चौघेही एकत्र दिसले, तसेच श्रीदेवी यांच्या मृत्युनंतर अर्जुनने सतत आपल्या वडिलांना साथ दिल्याचे देखील दिसून आले. आय़फा अवॉर्ड्स मुळे पुन्हा एकदा बाप-लेकाची ही जोडी दिसली असून श्रीदेवींच्या आठवणीत दोघेही भावुक झाल्याचे दिसून आले.