जळगावना प्रश्‍नासवर सत्तामधलासनी पंचाईत
महा एमटीबी   31-Jul-2018
 

 
 
गम्प्या : सध्या जळगाव महापालिकानं निवडणूकनं वातावरण तापेल शे
टम्प्या : सगळाकडे निवडणूकनीस चर्चा व्हयी राहीनी
गम्प्या : हा मी पण शहरमा पहाटेले फिराले गयतू
टम्प्या : मग काय जायं
गम्प्या : अरे तठे पण निवडणूकनीस बात चालू व्हती.
टम्प्या : काय चालू व्हतं तठे, काय एकं तू
गम्प्या : अरे रोटरी वेस्टकडून शेना सगळा पक्षासन चर्चाना कार्यक्रम ठेयेल व्हता.
टम्प्या : मग काय झाय?
गम्प्या : त्याठिकाणे लोकेसनी पक्षासना या कार्यक्रमा येयेल लोकपरतीनिधीसले प्रश्‍न विचारीसन जाम करी टाकं
टम्प्या : तेनामुळे तेसले उत्तर देवानं काय हाऊ मोठा प्रश्‍न पडना
गम्प्या : लोकेसनी प्रश्‍न इचारी ऊबगाडी टाकं तठे येयेल राजकारणी लोकेसले, तेनामुळे सत्तामाधला लोकपरतीनिधी चिडेचुप बसनात.
टम्प्या : हायी भी खरं शे.
गम्प्या : इके्रता आणि गायाधारक लोकेसना काय यनावर लोकेसी तेसले प्रश्‍न इचारा
टम्प्या : सत्तामाधला लोकेसनी इतका वरीस करं काय?
गम्प्या : हाऊ प्रश्‍न चर्चामा मांड
टम्प्या : तेनामुळे यले उत्तर देवानं काय म्हणून
गम्प्या : एकएक जण ह्या कार्यक्रमाईन तेनानंतर गायब जायात
टम्प्या : सत्तामाधला लोकपरतीनिधीसले तोड देणं भी अवघड जाय
गम्प्या : तेनापायरे नितीन लढ्ढा कार्यक्रमाईन बाहेर पडनात
टम्प्या : ह्या कार्यक्रमा शिवसेनाकडून नितीन लढ्ढा, भाजपाकडून आमदार भोेळे तर राष्ट्रवादीकडून गुलाबराव देवकर, कॉंग्रेसकडून राधेश्याम चौधरी हजर व्हतात.
गम्प्या : तेनामा सत्तामाधला लोकेसनी प्रश्‍न इचारी पार जाम करी टाकं
टम्प्या : मग काय झाय?
गम्प्या : तू तू मी मी व्ययनी तेसना
टम्प्या : पण लोकसले तेसना प्रश्‍नासन उत्तर भेटणं नही
गम्प्या : तेनामुळे शहरमा कालदीन दिनभर हाईच चर्चा व्हती.
टम्प्या : खरं शे बरंका हाई
गम्प्या : लोकेसल समोरे जावनापहेलेच या सत्तामाधला लोकपरतीनिधी कार्यक्रम सोडी पयी गयात.
टम्प्या : तेनामुळे आयेजकेसनी कार्यक्रम अर्धामानच बंद करी दिना.
गम्प्या : चर्चाना कार्यक्रमा येयेल लोकेसनी शहरमाधल प्रश्‍न इचारात
टम्प्या : पण सत्तामाधला तेनावर बोलू शकना नहीत.
गम्प्या : हाई चर्चामा लोकेसले तेसाना शहरना समस्यासन उत्तर भेटनच नही.
टम्प्या : तेनामुळे लोके नाराज व्हयनात
गम्प्या : लोकेसनी संधी भेटनी सगळा प्रश्‍न थेट इचारी टाकात तेसनी
टम्प्या : तेनापायरे महापालिकामधला सत्तावालासनी पंचायत व्हयीन
गम्प्या : तुले माहित शे
टम्प्या : काय व्हयनं.
गम्प्या : निवडणूकमा परचार रंगमा येयेल शे. हाई निवडणूकमा खरी लढत देखाले भेटाव शे.
टम्प्या : तेनाच साठेच सगळाच पक्षासना जोरमा प्रचार चालू शे