तर पुढच्या मे मध्ये येणार "स्टूडंट ऑफ द इयर - २"
महा एमटीबी   30-Jul-2018


 
 
मुंबई :  करण जौहर नेहमीच त्याच्या चित्रपटांसाठी चर्चेत राहिला आहे. त्याने प्रदर्शित केलेल्या स्टूडंट ऑफ द इयर या चित्रपटातून चित्रपटसृष्टीला आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरुण धवन सारखे कलाकार मिळाले आणि आता तो घेऊन येत आहे स्टूडंट ऑफ द इयर -२. १० मे २०१९ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला हजर राहणार आहे, अशी माहिती करणने आज इंस्टाग्रामच्या माध्यमातून दिली आहे. यामध्ये मुख्य भूमिकेत टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया असणार आहेत. टायगर श्रॉफ जरी प्रेक्षकांच्या ओळखीचा असला तरी इतर दोघींना भेटण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
 
 
 
 
या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत पुनीत मल्होत्रा. धर्मा प्रोडक्श्नस प्रदर्शित या चित्रपटासाठी अनेक प्रेक्षक उत्सुक आहेत. त्याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे करण जौहर यांच्या चित्रपटांचे एक वेगळे फॅन फॉलोइंग आहे, आणि त्यांच्यासाठी स्टूडंट ऑफ द इयर -२ म्हणजे पर्वणीच असणार, त्यामुळे यावेळी कथा काय असेल, चित्रपट कसा असेल नवीन कलाकारांची भूमिका आणि अभिनय कसा असेल या विषयी उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.
 
याआधी आलेल्या स्टूडंट ऑफ द इयर या चित्रपटातून आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरुण धवन यांनी आपल्या उत्तम अभिनयाचे प्रदर्शन यामध्ये केले होते. त्यानंतर या तीनही कलाकारांनी चित्रपटसृष्टीत आपले एक विशेष स्थान बनवले आहे. मात्र हा चित्रपट अत्यंत "हाय फाय" लोकांसाठीचा चित्रपट असून सत्यपरिस्थितीशी याचा संबंध नाही, अशा प्रकारची टीका देखील यावर करण्यात आली होती. त्यामुळे स्टूडंट ऑफ द इयर -२ बद्दल प्रेक्षकांचे काय मत असेल हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.