संसदेत प्रश्नांची संख्या कमी : आता आपल्या खासदारांना स्वत: विचारा प्रश्न
महा एमटीबी   03-Jul-2018

 
 
नवी दिल्ली :  "संसदेत खासदारांनी एका दिवसात विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांच्या संख्येत कमी केली आहे. आधी ही संख्या १०० होती ती आता कमी करून ५ करण्यात आली आहे. त्यामुळे आता आपल्या लोकशाहीच्या अधिकारांचा वापर करण्याची वेळ झाली आहे. आपल्या खासदारांना विचारण्यासाठी अधिकाधिक प्रश्न तुम्ही पाठवा." असे आवाहन सामान्य जनतेला काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे.
 
काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून याविषयी माहिती देण्यात आली आहे. ७ जुलै पर्यंत आपल्या खासदारांना विचारण्यासाठी सामान्य नागरिकांनी प्रश्न विचारावेत असे आवाहन काँग्रेस पक्षाने केले आहे.
 
 
 
 
२०१९ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्षांतर्फे समाज माध्यमांवरुन जनसामान्यांचे मत मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात येत आहे. त्यापैकीच काँग्रेसचा हा एक प्रयत्न असणार असे म्हणणे वावगे ठरणार नाही.