फिफा विश्चचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत ब्राझील आणि बेल्जियमची धडक
महा एमटीबी   03-Jul-2018
 
 
 
 
रशिया : फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज ब्राझील आणि बेल्जियमने देखील धडक मारली आहे. त्यामुळे आता फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीसाठी आता ब्राझील, बेल्जियम, रशिया आणि क्रोएशिया हे चार देश आमनेसामने येणार आहे. काल फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत रशिया आणि क्रोएशिया या दोन देशांनी देखील धडक मारली. 
 
 
 
 
 
ब्राझीलने आधीच्या सामन्यात मजबूत अशा मॅक्सिकोला २-० अशा फरकाने मागे टाकत उपांत्यपूर्व फेरीत जोरदार धडक मारली आहे. तर बेल्जियमने जपानला ३-२ अशा केवळ एका गोलच्या फरकाने मागे टाकत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. यामुळे आता मॅक्सिको आणि जपान या दोन्ही देशांना फिफा विश्वचषक २०१८ मधून माघारी जावे लागणार आहे. 
 
 
 
त्यामुळे आता उपांत्य आणि अंतिम सामना चांगलाच रंगणार आहे. बरेच लोक आपापल्या परीने कोण जिंकेल याचे ठोकताळे आत्तापासून बांधू लागले आहे. त्यामुळे २०१८ चा फिफा विश्वचषक कोण जिंकत याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.