आरोपेसमुळे निवडणूकप्रचारमा रंगत वाढनी
महा एमटीबी   29-Jul-2018

आरोपेसमुळे निवडणूकप्रचारमा रंगत वाढनी


 
 
गम्प्या : महापालिका निवडणूक दोन दिवसमान शे.
टम्प्या : तेनामुळे निवडणूकना प्रचार जोरमा सुरू शे.
गम्प्या : वॉर्डावॉर्डासमा उमीदवार व कार्यकर्तांसनी नुसती गर्दी शे.
टम्प्या : बरोबर शे. कारण तेसनाकडे प्रचारसाठे आते दोन दिन शिल्लक शे.
गम्प्या : हा तेनामुळे त्या थेट घरघरमा जाई, प्रचार करी राहेनात
टम्प्या : एवढंभी समजत नही का भाऊ तुले.
गम्प्या : शहरमान वॉर्डावॉर्डासमा प्रचार सभा व्हयी रायन्यात
टम्प्या : हा खरी शे हाई बात
गम्प्या : तेनामा राजकारणी एकमेकेसवर आरोप करी रायनात
टम्प्या : एक पक्षाना नेतांनी आरोप करा की दुसरा तेले उत्तर देसं
गम्प्या : मग रंगस सामना, हाई काम मनं ते काम म्हणं
टम्प्या : पण तुले माहीत शे का?
गम्प्या : कसाबद्दल मनी रायना तू
टम्प्या : महापालिकाबद्दल म्हणी रायनु.
गम्प्या : महापालिकामा सत्ता जेसनाकडे व्हती तेसनी एवढा वरीस काम काही करं नही आते त्या काम करानं आश्‍वासन दी रायनात सभासमा
टम्प्या : मग एवढा वरिस येनसनी सत्तामा राहीसन करं काय? हाऊ भी प्रश्‍न शे.
गम्प्या : राजकारणमा आरोप व्हत राहतंस, पण शेवट लोके काय करतीन यनांवर सगळं काही ठरणार शे.
टम्प्या : तुनं म्हणणं एकदम बरोबर शे. पण लोके मतदानना दिन कोणता पक्षासना उमेदवारीसले निवडतस यनावर सत्तानं गणित शे.
गम्प्या : आते उमीदवारेसपा शेवटना दोन दिवस शे. तेनामुळे प्रचारना हाऊ शेवटना टप्पा शे.
टम्प्या : तेनामुळे पक्षासना नेता एकमेकेसर चहूबाजून टीका करी रायनात
गम्प्या : सत्ताधारीसनी महापालिकावर कर्ज कयं हाऊ आरोप व्हय रायना.
टम्प्या : हाई तर खरं शे.
गम्प्या : शहरामधला प्रत्येक जणवर छत्तीस हजारनं कर्ज शे. तेनामुळे सत्तामाधलासनी कर्ज काढी कामे करात.
टम्प्या : तेनामुळे शहरवर कर्ज वाढतंच गय.
गम्प्या : पण आते भाजपनी जळगाव शहरले नवं व्हिजन दाखेडेल शे.
टम्प्या : हा व्हिजन लोकेसले नक्की समजेल शे.
गम्प्या : जळगावना लोकेसले येणारा कायमा काय पाहिजे यंना अंदाज लीसन भाजपनी जाहीरनामा मांडले शे.
टम्प्या : ना. गिरीश महाजन महापालिकामा भाजपा सत्ता येवासाठे प्रचारसभा ली रायनात
गम्प्या : या सभासमाना ना. गिरीश महाजन लोकेसले भाजपले मतदान करानं जळगावकरेसले सांगी रायनात
टम्प्या : तेनासाठे भाजपना आ. राजू मामा भोळे भी वॉर्डावॉर्डामा जाई सभा ली रायनात
गम्प्या : कालदीनच मना वॉर्डामा भाजपनी सभा व्हयनी
टम्प्या : महापालिकामा एकदाव संध दिनी तर जळगावमा बदल घडावसूत असं तेसनं म्हणणं शे.
गम्प्या : निवडणूक प्रचारना आते शेवट शे. तेनापायरे उमीदवाररेसनी उमीदभी वाढेल शे.
टम्प्या : तेनाचसाठे मतदान करनास पडी.