कलाकारांनीही मानले आजच्या दिवशी 'गुरु' चे आभार
महा एमटीबी   27-Jul-2018

 
 
मुंबई :  आज गुरु पौर्णिमा. आजचा दिवस हा आपण सगळ्यांसाठीच खास आहे. आजच्या दिनानिमित्त सोशल मीडियावर अनेक नागरिकांनी आपल्या गुरुंच्या आठवणीत अनेक पोस्ट्स केल्या आहेत. मात्र आजच्या या खास दिवशी सिनेसृष्टीतील काही दिग्गज कलाकारांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या गुरुंचे आभार मानले आहेत.
 
 
 
करण जौहर याने ट्विटरच्या माध्यमातून यश चोप्रा यांच्याबद्दल आजच्या दिवशी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. "आज गुरु पौर्णिमेच्या दिवशी मला चोप्रा परिवाराचे आभार मानायचे आहेत. यश अंकल यांनी मला नेहमीच माला मार्गदर्शन केले आहे, तर आदित्यने नेहमीच मला चांगली शिकवण दिली, आणि मी नवीन असताना उदयने माझी खूप साथ दिली आहे. या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा." असे म्हणत करण ने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
 
 
 
तर मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासराव याने "सिनेमा पाहू लागलो, तेव्हापासून त्यांचा चाहता झालो. अभिनय करायला लागलो आणि त्यांना गुरू मानलं. गेल्या १२ वर्षांच्या सहवासात त्यांना कधी सांगितलं नाही, आज पहिल्यांदा माझ्या गुरूला लिहीलेलं हे मनोगत.." असे म्हणत अशोक सराव यांच्या बद्दलच्या आपल्या भावना एका पत्रातून व्यक्त केल्या आहेत. त्यांचे हे पत्र अत्यंत भावनाप्रधान असून त्यांनी 'अशोक मामा' यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
 
तर कलाकार रणदीप हुड्डा याने ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा यांच्याप्रती आपल्या भावना ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. सचिन तेंडुलकर याने आपले गुरु रमाकांत आचरेकर यांच्यासोबत घालवलेल्या काही महत्वाच्या क्षणांचे फोटो पोस्ट करत त्यांना नमन केले आहे.