मंगळ ग्रहावर पाणी वैज्ञानिकांचा नवा शोध
महा एमटीबी   26-Jul-2018
 
 
 
 
 
मंगळ ग्रहावर द्रव स्वरुपात पाणी असल्याचा शोध वैज्ञानिकांनी नुकताच लावला आहे. पाण्याचे अस्तित्व मंगळ ग्रहावर असून हे पाणी जमिनीच्या आत सरोवरच्या स्वरुपात आहे असे म्हणण्यात आले आहे. त्यामुळे आता मंगळ ग्रहावर वास्तव्य करण्याचा विचार मानव करू शकतो असे वैज्ञानिकांकडून सांगण्यात आले आहे. 
 
 
जर मंगळ ग्रहावर पाणी असेल तर जीवसृष्टी देखील तिथे अस्तित्वात राहू शकते. यामुळे मानवाला देखील तिथे जीवनास पोषक वातावरण मिळेल असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे भविष्यात जर पृथ्वीला काही धोका निर्माण होणार असेल तर मानव जगत मंगळावर वास्तव्य करू शकते यासाठी मंगळ मोहीम राबवण्यात येत आहे. 
 
 
भारताकडून मंगळयान ही भारताची पहिली मंगळ मोहीम राबवण्यात आली होती. हे यान आंध्रप्रदेश राज्यातील श्रीहरिकोटा येथून सतीश धवन अंतराळ केंद्रावरून मंगळाच्या दिशेने ५ नोव्हेंबर, इ.स. २०१३ रोजी प्रक्षेपित करण्यात आले होते. यासाठी पीएसएलव्ही सी-२५ हे प्रक्षेपण अस्त्र वापरण्यात आले होते. 
 
 
साधारणतः २५ दिवस हे यान पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावले आणि ३० नोव्हेंबरला हे यान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून मंगळाकडे झेपावले आणि २४ सप्टेंबर, इ.स. २०१४ रोजी हे यान मंगळाच्या कक्षेत स्थिरावले होते. जगातील वैज्ञानिकांनी संशोधन करून हा शोध लावला असल्याचे सध्या म्हटले जात आहे.