मुष्टियोद्धा स्पर्धेत दीपक पुनियाने मिळविले सुवर्ण
महा एमटीबी   23-Jul-2018
 
 
 
 
 
नवी दिल्ली : नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या आशियाई ज्युनिअर मुष्टियोद्धा स्पर्धेत भारताचे मुष्टियोद्धा यांनी सुवर्ण कामगिरी करत भारताला तीन सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. मुष्टियोद्धा दीपक पुनिया, साजन भानवाल आणि सचिन राठी या तिघांनी या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले आहे. 
 
 
दीपक पुनिया याने ८६ किलोग्रॅम गटात, सचिन राठी याने ७४ किलोग्रॅम गटात तर साजन भानवाल याने हे सुवर्ण पदक पटकाविले आहे. तर मुष्टियोद्धा मोहित याने १२५ किलोग्रॅम वजनी गटात कांस्य पदक मिळविले आहे. त्यामुळे भारताला या स्पर्धेत एकूण तीन सुवर्ण आणि एक कांस्य पदकांची कमाई करता आली आहे. 
 
 
नवी दिल्ली येथे ही स्पर्धा सुरु असून भारताकडून एकूण दहा मुष्टियोद्धा वेगवेगळ्या वजनी गटातून अंतिम सामन्यात गेले होते मात्र यातील केवळ तीन मुष्टियोद्धा यांनीच सुवर्ण पदकांची कमाई केली आहे.