महिला हॉकी विश्वचषक स्पर्धा आजपासून लंडन येथे सुरु
महा एमटीबी   21-Jul-2018
 
 
 
 
लंडन : आजपासून महिला हॉकी विश्वचषक स्पर्धा लंडन येथे सुरु होत असून पहिला सामना भारत आणि इंग्लन यांच्यात खेळवला जाणार आहे. संपूर्ण जगाचे लक्ष या हॉकी विश्वचषक स्पर्धेकडे आता लागले आहे. फिफा विश्वचषक २०१८ नुकतेच समाप्त झाल्याने आता पुन्हा एकदा संपूर्ण जगाच्या नजरा महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेकडे लागल्या आहेत. आजच्या सामन्यासाठी भारतीय संघाला अनेक क्षेत्रांतून प्रोत्साहन दिले जात आहे. 
 
 
 
 
यावर्षीची ही स्पर्धा १४ वी महिला हॉकी स्पर्धा आहे. २१ जुलै ते ५ ऑगस्ट २०१८ दरम्यान ही स्पर्धा चालणार आहे. १६ देशांचे महिला संघ या स्पर्धेत असून ली व्हॅली हॉकी आणि टेनिस सेंटर येथे हे सामने खेळले जाणार आहेत. हे सामने चार गटांमध्ये खेळले जाणार आहेत. ते गट खालीलप्रमाणे : 
 
 

पूल A : चीन, इटली, नेदरलँड्स व दक्षिण कोरिया

पूल B : इंग्लंड, भारत, अमेरिका, आयर्लंड

पूल C : जर्मनी, दक्षिण आफ्रिका, अर्जेंटिना, स्पेन

पूल D : ऑस्ट्रेलिया, जपान, न्यूझीलंड, बेल्जियम