फिफा विश्चचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत रशिया आणि क्रोएशियाची धडक
महा एमटीबी   02-Jul-2018
 
 
 
 
रशिया : फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत काल रशिया आणि क्रोएशियाने धडक मारली आहे. त्यामुळे आता फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीसाठी आता रशिया आणि क्रोएशिया हे दोन देश आमनेसामने येणार आहे. स्पेन आणि रशिया यांच्यात झालेल्या सामन्यात पेनल्टी शूटआउटच्या मदतीने रशियाने स्पेनला ४-३ च्या फरकाने मागे टाकले आहे. 
 
 
 
 
 
पेनल्टी शूटआउटच्या मदतीने रशियाने केवळ एका फरकाने स्पेनला या विश्वचषकातून बाहेरचा मार्ग दाखविला आहे. आज रशिया आणि क्रोएशिया यांच्यात सामना पाहायला मिळणार आहे. यावर्षीचा फिफा विश्वचषक बऱ्याच प्रमाणात मनोरंजक ठरला आहे. शेवटच्या सामन्यात आता कोणता संघ खेळतो याकडे सगळ्यांच्या नजर लागला आहे.