'संजू' चित्रपटाची दूसरी बाजू देखील नक्की दाखवा : योगेश सोमण
महा एमटीबी   02-Jul-2018
 
 
 
 
मुंबई :  संजू चित्रपट नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे, त्याचे भरभरून कौतुक देखील होत आहे. मात्र हे सर्व होत असतानाच मराठी अभिनेते योगेश सोमण यांनी मात्र या चित्रपटाची मोठ्या प्रमाणात टीका केली आहे. "संजू" या चित्रपटाची दूसरी बाजू देखील नक्की दाखवा असे आवाहन सोमण यांनी केले आहे.
 
 
 
 
 
संजू या चित्रपटात एका देशद्रोह्याचे कौतुक करण्यात आले आहे तसेच एका अत्यंत व्यसनाच्या आहारी गेलेल्या माणसाला 'ग्लोरिफाय' करण्यात आले आहे. असे त्यांनी फेसबुक वर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
 
योगेश सोमण यांनी फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट करुन 'संजू' चित्रपटाबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. या व्हिडियोत त्यांनी पालकांना आवाहन करत म्हटले आहे की, "उद्या जर तुमचा मुलगा नशा करुन घरामध्ये आणि आणि आपल्याला बिलगला, तर आपण खासदार नाही, किंवा आपली बहिणही खासदार नाही. सामान्य घरातील माणसं आहोत. घरातील किडूक मिडूक विकून आपलं पोरगं बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. पण त्याआधीच संजयसारख्या व्यक्तिमत्वाला ग्लोरिफाय होऊ द्यायचे नाही. संजय दत्तच्या आयुष्याच्या दोन्ही बाजू आजच्या तरुण पिढिला दाखवायला हवे." असेही ते यावेळी म्हणाले.
 
केवळ एवढेच नाही तर त्यांनी सलमान खान यांच्यावर देखील टीका केली आहे. काही दिवसांनी सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणावर भाईजान नावाचा चित्रपट येईल, अशी खोचक टीका देखील त्यांनी यावेळी केली.