गुगलवर ‘इडियट टाईप’ करा पहा कोण येत ते?
महा एमटीबी   18-Jul-2018
 
 
 
 
गुगलवर तुम्ही कधी ‘इडियट टाईप’ केले आहे काय? नसेल केले तर आता करून पहा आणि पहा तर तुमच्या मोबाईल आणि संघणकाच्या पटलावर काय येत ते? गुगलवर इडियट टाईप’ केल्यावर चक्क अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दाखवितात. तुम्हाला खोट वाटत असेल तर तुम्ही देखील हा प्रयोग करून पहा.
 
 
डोनाल्ड ट्रम्प यांचे विचार आणि वक्तव्य हे संपूर्ण जगाला माहित आहेत. त्यामुळे त्यांचे विचार हे जरा वेगळ्या धाटणीचे असल्याने त्यांना बरेच लोक ‘इडियट’ या शब्दाने उच्चारतात त्यामुळे सध्या डोनाल्ड ट्रम्प यांना गुगलवर देखील इडियट या शब्दाने सर्च केले तर चक्क डोनाल्ड ट्रम्प हेच आपल्या पुढे येतात. या आधी पप्पू असे गुगलवर सर्च केले तर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना गुगल पहिले दाखवितो. आणि फेकू हा शब्द सर्च केला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुगलवर झळकतात. आता यामागे काय कुणाचा हात आहे हे मात्र सांगता येणार नाही मात्र सध्या नेटकरी याची जाम खिल्ली उडवतांना दिसत आहेत.