भारतीय महिला क्रिकेट संघाला आता नवे प्रशिक्षक
महा एमटीबी   16-Jul-2018
 

 
 
मुंबई : बीसीसीआयकडून भारतीय महिला क्रिकेट संघाच्या अंतरीम प्रशिक्षकपदी भारतीय संघातील माजी फिरकीपटू रमेश पोवारची नेमणूक करण्यात आली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक तुषार अरोठे यांनी जुलैमध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ही नेमणूक करण्यात आली.
 
येत्या २५ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघ बँगलोरमधील कॅम्पमध्ये सहभागी होणार आहेत. यावेळी रमेश पोवार हे त्यांना प्रशिक्षण देतील. तसेच अंतरीम प्रशिक्षकाची नेमणुक करुनही मुख्य प्रशिक्षकासाठी बीसीसीआयने अर्ज मागवले आहेत, त्यामुळे मुख्य प्रशिक्षक मिळत नाहीत तोपर्यंत संघाचे अंतरीम प्रशिक्षक तर बीजू जॉर्ज हे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहतील.
 
तसेच ज्यांचे वय ५५ वर्षांपेक्षा कमी असेल ते मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज पाठवू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारिख २० जुलै पर्यंतची देण्यात आली आहे. रमेश पोवार यांनी नुकतेच मुंबई रणजी संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता मात्र त्यामध्ये त्यांना यश मिळाले नाही. पोवार यांनी भारतासाठी कसोटी सामना आणि एकदिवसीय सामना खेळलेला आहे. तसेच ते इंडियन प्रिमिअर लीगसोबतही जोडले गेले आहेत.