फिफा विश्वचषक २०१८ : फ्रान्स वि. क्रोएशिया रोमहर्षक सामना
महा एमटीबी   15-Jul-2018


मॉस्को : फिफा विश्वचषक २०१८ मधील फ्रान्स आणि क्रोएशिया यांच्यातील अंतिम सामन्याला मॉस्को येथे सुरुवात झाली आहे. अत्यंत रोमहर्षक आणि अटीतटीचा असा हा सामना सुरु असून आतापर्यत फ्रान्सने दोन गोल करून सामन्यात आघाडी घेतली आहे. तर क्रोएशियाने देखील आपले खाते उघडले आहे. त्यामुळे सध्या स्पर्धेत फ्रान्स आणि क्रोएशिया यांच्यात २-१ अशी स्थिती निर्माण झाली आहे.

सर्व जगाला उत्सुकता लागलेल्या या सामन्याच्या सुरुवातीलचा फ्रान्सने पहिला गोल करत स्पर्धेत १-० ने आघाडी घेतली. यानंतर क्रोएशियाने देखील आपले खाते उघडत पहिला गोल करत स्पर्धेत १-१ अशी बरोबर केली. परंतु थोड्याच वेळात क्रोएशियाच्या चुकीमुळे फ्रान्सला मिळालेल्या पेनल्टी शुटआउटचा फ्रान्सने पुरेपुर फायदा घेत, दुसरा गोल केला आहे.