फिफा २०१८ : अंतिम सामन्यात फ्रान्सचा रोमहर्षक विजय
महा एमटीबी   15-Jul-2018

४-२ ने केली क्रोएशियावर मात ; क्रोएशियाची देखील कडवी झुंज
मॉस्को : अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या फिफा विश्वचषक २०१८ च्या अंतिम सामन्यामध्ये फ्रान्सने क्रोएशियावर ४-२ अशा गुणांनी रोमहर्षक विजय मिळवला आहे. तब्बल २० वर्षानंतर फ्रान्सने फिफा विश्वचषक जिंकला असून या सामन्यात क्रोएशियाने देखील फ्रान्सला अत्यंत कडवी झुंज दिली. परंतु तरी देखील क्रोएशियाला विश्वचषक मात्र जिंकता आला नाही.
रशियाची राजधानी मॉस्को येथे हा रोमहर्षक सामना खेळवला गेला होता. सामन्याच्या सुरुवातीलचा फ्रान्सने पहिला गोल करत स्पर्धेत १-० ने आघाडी घेतली. यानंतर क्रोएशियाने देखील आपले खाते उघडत पहिला गोल करत स्पर्धेत १-१ अशी बरोबर केली. परंतु थोड्याच वेळात क्रोएशियाच्या चुकीमुळे फ्रान्सला मिळालेल्या पेनल्टी शुटआउटचा फ्रान्सने पुरेपुर फायदा घेत, दुसरा गोल केला आहे. यानंतर सलग ५९ व्या आणि ६५ व्या मिनिटाला फ्रान्सने लागोपाठ दोन करत, आपला विजय निश्चित केला.