अपघातस्थळी जलसंपदामंत्री आले ‘देवदूता’सारखे धावून!
महा एमटीबी   12-Jul-2018

महामार्गावरील पलटी झालेले वाहन बाजूला करून केली वाहतूक सुरळीत

 
 
जळगाव, १२ जुलै :
नागपूरहून जळगावकडे येत असताना राज्याचे जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन हे पुन्हा एकदा अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूता’प्रमाणे धावून आल्याचा प्रत्यय आला! नांदुरा आणि मलकापूर रस्त्यावर टोमॅटो घेऊन जाणारी पिकअप व्हॅन सकाळी ६ वाजेच्या सुमारास पलटी झाल्यामुळे महामार्ग क्रमांक ६ वर दोन्ही बाजूला ४ ते ५ किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. मात्र याच रस्त्यावरून जाणारे ना. गिरीश महाजन यांनी कुठलीही वेळ न दवडता आपल्या कृतिशील स्वभावानुसार त्यांनी तातडीने इतर लोकांच्या मदतीने पलटी झालेले वाहन बाजूला करण्यास मदत केली. यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
 
 
अपघातात जखमी झालेल्या वाहन चालकाला तातडीने रुग्णालयात पाठविण्याची व्यवस्था ना. महाजन यानी केली. घटना कुठलीही असो वा कुठेही घडो, जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन जर त्या ठिकाणी असले तर नेहमी तत्परतेने मदतीसाठी स्वतः धावून जातात हा त्यांचा स्वभाव असून त्याचा प्रत्यय अनेकांना आला.