पाकिस्तानमध्ये आत्मघातकी हल्ला, १३ नागरिकांचा मृत्यू
महा एमटीबी   11-Jul-2018
 
 
 
 
पाकिस्तान :  पाकिस्तानमधील पेशावर शहरात आज आत्मघातकी हल्ला झाला असल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात तब्बल १३ नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात ५० नागरिक जखमी झाले असून त्या नागरिकांवर सध्या जवळच्या रुग्णालयात उपचार केले जात आहे. या हल्ल्यात बरेच नागरिक जखमी झाले असल्याने घटनास्थळी लगेच मदतकार्य सुरु करण्यात आले. 
 
 
 
 
 
या घटनेवर पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख इमरान खान यांनी दुख: व्यक्त करत या हल्ल्यात ज्या नागरिकांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांचे सात्वन केले आहे. या हल्ल्यात हारून बिल्लौर आणि एएनपीचे कार्यकर्ते यांचा देखील मृत्यू झाला आहे अशी माहिती देखील त्यांनी यावेळी ट्वीट मधून दिली. या सगळ्या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे हे अजून पुढे आले नाही मात्र याचा शोध पाकिस्तानचे पोलीस घेत आहेत.