'काश्मीरमधील लहान मुलांचे रक्षण करा'
महा एमटीबी   10-Jul-2018

पाकिस्तानची संयुक्त राष्ट्रांना पुकार
न्यूयॉर्क : जगभराती लहान मुलांवर होणारे अत्याचार आणि बाल हक्कांचे होणारे हनन यावर संयुक्त राष्ट्रांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या चर्चेमध्ये पाकिस्तानने पुन्हा काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आहे. भारताकडून काश्मीरमध्ये लहान मुलांवर देखील प्रचंड अत्याचार होत, असून त्यांच्या रक्षणासाठी संयुक्त राष्ट्रांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांमध्ये केले आहे.


संयुक्त राष्ट्रांमधील पाकिस्तानच्या राजदूत मलिहा लोधी यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. जगभरातील लहान मुले आणि त्यांच्या बाल हक्कांच्या रक्षणासाठी आवश्यक असलेल्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी म्हणून संयुक्त राष्ट्रांमध्ये एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पाकिस्तानी राजदूतांनी पाकिस्तानची बाजू मांडत, नेहमीप्रमाणे काश्मीरचा प्रश्न उपस्थित केला. काश्मीरमध्ये भारत हा तेथील स्थानिक नागरिकांवर सातत्याने अत्याचार करत आहे, असा आरोप त्यांनी आपल्या वक्तव्यात केला. काश्मीरमध्ये लहान मुलांवर पॅलेट गनने हल्ला केला जात असून यामध्ये आजपर्यंत अनेक मुलानाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्रांनी याकडे देखील गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे, असे अवाहन त्यांनी केले.