कर्करोगाशी झुंझ देणारी सोनाली नव्या रूपात जगासमोर, चाहत्यांचे मानले आभार
महा एमटीबी   10-Jul-2018

 
 
 
न्यूयॉर्क :  गेल्या आठवड्यातच प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे कॅन्सरने ग्रसित झाली असल्याची माहिती समोर आली आणि एकच सिनेसृष्टीत आणि चाहत्यांमध्ये खळबळमाजली. यानंतर चाहत्यांने सोनालीला भरपूर संदेश पाठवत तिच्या प्रगतीसाठी शुभेच्छा पाठवल्या, तसेच सिनेसृष्टीतून देखील तिला बळ देणाऱ्या अनेक पोस्ट आणि संदेश सोशल मीडियावर आढळून आले. आज सोनाली बेंद्रे हिने आपल्या नव्या रूपातील एक फोटो पोस्ट करत सर्व चाहत्यांचे आणि सिने जगतातील लोकांचे आभार मानले आहेत.
 
 
 
 
"अनेकदा आपण किती खंबीर आहोत हे तो पर्यंत कळत नाही जो पर्यंत नियती आपल्याला अशा परिस्थितीत उभं करत नाही. गेल्या काही दिवसांपासून मला मिळालेल्या असीम प्रेमाबद्दल आणि आलेल्या शुभेच्छांच्या संदेशाबद्दल मी खरंच मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. अनेकांनी कॅन्सर सोबत त्यांनी किंवा त्यांच्या आप्तेष्टांनी केलेल्या लढाईविषयी संदेश लिहीले यामुळे मला प्रेरणा मिळाली तसेच आपण एकटे नाही, असे देखील जाणवले. आता या क्षणी मी अत्यंत सकारात्मक राहण्याचा आणि या रोगावर मात करण्याचा प्रयत्न करत आहे." अशा शब्दात सोनाली हिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
 
 
 
 
 
 
 
 
 
कॅन्सर म्हणजेच कर्करोग हा एक अत्यंत दुर्धर आजार असून त्यावर मात करण्यासाठी खूप खंबीर असण्याची आवश्यकता असते, सोनालीच्या या पोस्टमुळे ती किती खंबीर आहे याची प्रचिती येते. काही दिवसांपूर्वीच सोनाली हिने तिला हायग्रेड कर्करोग असल्याचे तिच्या ट्विटर खात्यावरुन सांगितले. ती न्यूयॉर्क येथे उपचार घेत असल्याचे देखील तिने सांगितले. तिच्या चाहत्यांनी आणि सिनेसृष्टीतील अनेकांनी तिच्या त्वरित प्रगतीसाठी प्रार्थना केली आहे