फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत राफेल नदालची धडक
महा एमटीबी   09-Jun-2018
 

 
 
 
फ्रेंच : क्रमांक एकचा स्पेनचा टेनिसपटू राफेल नदाल याने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. राफेलने आर्जेन्टीनाच्या जुआन मार्टिन डेल पोत्रो या खेळाडूला उपांत्य फेरीत अगदी सोप्या खेळाने मागे टाकत या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक घेतली आहे. राफेल नदालने उपांत्यपूर्व फेरीत आर्जेन्टीनाच्याच डिएगो स्वाट्र्जमान याचा पराभव करत उपांत्य फेरीत आपली जागा निश्चित केली होती. 
 
 
 
आता आर्जेन्टीनाच्या जुआन मार्टिन डेल पोत्रो याला राफेलने पहिल्या सेटमध्ये ६-४, दुसऱ्या सेटमध्ये ६-१ टर तिसऱ्या सेटमध्ये ६-२ अशा फरकाने मागे टाकत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. ऑस्ट्रियन खेळाडू डॉमिनिक टीम याच्यासोबत आता अंतिम फेरीत राफेल नडाल खेळणार आहे. राफेल नदाल आणि डॉमिनिक टीम यांच्यात उद्या हा अंतिम सामना रंगणार आहे. 
 
 
 
 
 
राफेल नदालने आजपर्यंत १४ ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा व २४ मास्टर्स टेनिस स्पर्धा जिंकल्या आहेत. २००८ साली झालेल्या बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये त्याने स्पेनसाठी सुवर्णपदक पटकावले होते. २०१० सालची यू.एस. खुली स्पर्धा जिंकून नदालने चारही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकण्याचा विक्रम पूर्ण केला. हा पराक्रम साधणारा खुल्या टेनिस काळामधील नदाल हा केवळ ७ वा व वयाने सर्वात लहान टेनिसपटू आहे.
 
 
 
राफेल नदालला तांबड्या मातीवरील सर्वोत्कृष्ट टेनिसपटू मानले जाते. त्याने आजवर विक्रमी नऊ वेळा फ्रेंच ओपनमध्ये तर विक्रमी आठ वेळा मोंटेकार्लो मास्टर्समध्ये अजिंक्यपद पटकावले आहे. १६० आठवडे जागतिक क्रमवारीमध्ये रॉजर फेडररच्या खालोखाल दुसर्‍या क्रमांकावर राहिलेल्या नदालने १८ ऑगस्ट २००८ रोजी सर्वप्रथम अव्वल क्रमांक गाठला. त्यानंतर ५ जुलै २००९ रोजी तो पुन्हा दुसर्‍या क्रमांकावर गेला व ७ जून २०१० रोजी त्याने दुसर्‍यांदा अव्वल क्रमांक मिळवला.